गावाची पार्श्वभूमी
दातली हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. दातली हे गाव जिल्हा मुख्यालय नाशिकपासून पूर्वेस ४१ किमी अंतरावर आहे तर दातली हे गाव सिन्नर तालुक्यातील आहे. ज्याप्रमाणे सिन्नरचे वैशिष्ट्य गोंदेश्वरी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे सिन्नर पासून पूर्वेकडे दहा किलोमीटर अंतरावर दातली हे गाव वसलेले आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव देव नदीच्या काठी वसलेले आहे. या गावची कथा म्हणजे अनेक वर्षांपूर्वी देव नदीमध्ये श्री महादेवाची पिंड वाहून येत होती व एका ठिकाणी नदीकिनारी सापडली. त्या उद्देशाने महादेवाच्या छत्रछायेखाली असणारे गाव तसेच महादेवाचे दुसरे नाव म्हणजे दंताळेश्वर. या नावावरूनच गावाला दातली हे नाव पडले. गावामध्ये महादेवाचे दंताळेश्वर नावाने मोठे मंदिर बांधलेले आहे. आज देखील गावांमध्ये गावाची परंपरा म्हणून महाशिवरात्रीला दंताळेश्वराच्या मंदिरात अभिषेक करून महाप्रसादाचा तसेच कीर्तनाचा अतिशय मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच गावामध्ये यात्रोत्सव देखील भरविला जातो. गावामध्ये सर्व पारंपारिक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जातात.
गावाची लोकसंख्या हि ३५१० असून दातली, केदारपूर, शहापूर हि गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ०२ आहेत तर अंगणवाडी ०८ आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालये आहेत.

श्री. हेमंत सदाशिव आव्हाड
सरपंच
मोबाईल क्र. – 8999522958

सौ. भिमाबाई कैलास भाबड
उपसरपंच
मोबाईल क्र. 7558283452

श्री. ज्ञानेश्वर शिवाजी पाटील
ग्रामपंचायत अधिकारी
मोबाईल क्र.- 9552882492
शासकीय उपक्रम
समारंभ
नाविन्यपूर्ण उपक्रम
.



















