यशोगाथा

       

नाशिक

भूजल समृध्द ग्राम स्पर्धा २०२२-२३

वरिष्ठ भूवैज्ञानिक

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नाशिक

आणि

जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्था

पर्यावरण रिसोर्स सेंटर, अहिल्यानगर

जिल्हा स्तरीय द्वितीय क्रमांक विजेते

मौजे – दातली, ता.सिन्नर, जि.नाशिक

जिथे नाही पाण्याचा वाव, असे आमचे दातली गाव

गावची पार्श्वभूमी –
                दातली हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.  दातली हे गाव जिल्हा मुख्यालय नाशिकपासून पूर्वेस ४१ किमी अंतरावर आहे तर दातली हे गाव सिन्नर तालुक्यातील आहे. ज्याप्रमाणे सिन्नरचे वैशिष्ट्य गोंदेश्वरी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे सिन्नर पासून पूर्वेकडे दहा किलोमीटर अंतरावर दातली हे गाव वसलेले आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव देव नदीच्या काठी वसलेले आहे. या गावची कथा म्हणजे अनेक वर्षांपूर्वी देव नदीमध्ये श्री महादेवाची पिंड वाहून येत होती व एका ठिकाणी नदीकिनारी सापडली. त्या उद्देशाने महादेवाच्या छत्रछायेखाली असणारे गाव तसेच महादेवाचे दुसरे नाव म्हणजे दंताळेश्वर. या नावावरूनच गावाला दातली हे नाव पडले. गावामध्ये महादेवाचे दंताळेश्वर नावाने मोठे मंदिर बांधलेले आहे. आज देखील गावांमध्ये गावाची परंपरा म्हणून महाशिवरात्रीला दंताळेश्वराच्या मंदिरात अभिषेक करून महाप्रसादाचा तसेच कीर्तनाचा अतिशय मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच गावामध्ये यात्रोत्सव देखील भरविला जातो. गावामध्ये सर्व पारंपारिक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जातात.

                गावाची लोकसंख्या हि ३५१० असून दातली, केदारपूर, शहापूर हि गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ०२ आहेत तर अंगणवाडी ०८ आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालये आहेत.

लोकसंख्या आढावा

गावाचे नाव स्री पुरुष अनु-जाती (SC)अनु-जमाती (ST)इतर एकूण लोकसंख्या
दातली११४११२१५१६०११०२०८६२३५६
केदारपूर२१६२३५२७४८३७६४५१
शहापूर ३४२३६१९५६०८७०३
एकूण १६९९ १८११ १८७ २५३ ३०७० ३५१०

गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र

गावाचे नाव भौगोलिक क्षेत्रलागवडी लायक क्षेत्र बागायत जिरायत इतर
दातली१४१२.०० हे.१२०१.०० हे.२४३.००हे.८६२.०० हे.९६.०० हे.
केदारपूर२८३.०० हे.२५८.०० हे.६४.०० हे.३२३.०० हे.७१.०० हे.
शहापूर२६४.०० हे.२४६.०० हे.७९.०० हे.३३८.०० हे.२९.०० हे.
एकूण१९६०.०० हे.१७०५.०० हे.३८६.०० हे.१५२३.०० हे.१२६.०० हे.

पाण्याच्या ताळेबंदानुसार रब्बी उन्हाळी व बारमाही पिकांचे नियोजन होते.

  • रब्बी पिके – गहू, कांदे, मका,
  • खरीब पिके – टमाटे , बाजरी ,सोयाबीन ,मका
  • उन्हाळी पिके – कांदे, भुईमुग ,हरभरा,मका

गावातील पशुधन –   

           दातली हे गाव बहुतांशी शेती व्यवसायावर अवलंबून असून सर्व शेती व्यवसायासोबत पशुपालन देखील मोठ्याप्रमाणात करताना दिसतात.

अ.क्र.पशुधनसंख्या
 गाय१२००
 बैल३०
 म्हैस४०
 शेळी१४०
 मेंढी१९०
 पोल्ट्री१००००
 इतर
 एकूण११६००

प्रमुख समस्या –

  1. पाण्याचा मोठ्या प्रमाणात अभाव –   

सिन्नर तालुका हा मुळातच दुष्काळग्रस्त असल्यामुळे तालुक्यातील 80 टक्के गावांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होतो तसेच पिण्याच्या पाण्याची देखील समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते.

फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्यात पिकांना देणे इतपत देखील पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उपलब्ध नसते.

पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे म्हणजेच पंचायत समितीकडे पत्रव्यवहार करून पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवावे लागत असत.

  • पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात 

पाण्याची पातळी खालवण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वात जास्त प्रमाणात पाण्याचा झालेला उपसा आणि पावसाचे पाणी अडवले न गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दातली गावामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि गावामध्ये प्रामुख्याने जवळपास 80 टक्के शेतीवर अवलंबून असलेले कुटुंब आहेत.                

शेतकरी आपल्या शेतीची पिकांसाठी प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा उपसा करून त्यांची भूक भागू लागल्याने भूगर्भातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला त्याचप्रमाणे भूजल पातळी देखील मोठ्या प्रमाणात खालावली

  • हवामान बदल –    

हवामान बदलामुळे फळे आणि भाजीपाला उत्पादनावर परिणाम होतो. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येतो त्याचप्रमाणे दातली या गावांमध्ये देखील शेतकऱ्यांच्या पिकांवर देखील हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत असेल त्यामध्ये भर म्हणजे ऐनवेळी होणारा पाऊस याचा देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत असे.

अश्या प्रकारे अनेक समस्या या गावामध्ये शेतकरी व इतरही लोकांना भेडसावताना दिसून येत होत्या.

उपाययोजना –

अटल भूजल योजना अंतर्गतगावामध्ये प्रथम ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा बोलवून अटल भूजल योजनेचे उद्धिष्ट सांगण्यात आले.  भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होणारी घसरण व बाधीत होत असलेली गुणवत्ता थांबविणेकरीता अटल भूजल योजनेतून कोणकोणत्या प्रकारची कामे करणे प्राथमिक टप्प्यावर करणे गरजेचे आहे याबद्दल माहिती देण्यात आली होती.

पाणी संवर्धन: ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेती तलाव, गाबियान बंधारे, नाला बुजविणे / नाला घाट बनविणे, गाव तलाव, वन तलाव यांचा वापर करून पाणी संवर्धन करणे आवश्यक आहे.

इतर प्रकारच्या सिंचन पद्धतींपेक्षा, जसे की स्प्रिंकलर जे फक्त ६५-७५% कार्यक्षम असतात, ठिबक सिंचन ९०% कार्यक्षमतेने झाडांना वापरलेले पाणी वापरण्यास अनुमती देते. आणि, ते वाहून जाणे आणि बाष्पीभवन कमी करते . ठिबक सिंचनामुळे झाडांच्या मुळांच्या भागात हळूहळू पाणी वापरले जाते जिथे त्याची सर्वात जास्त आवश्यकता असते. ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले.

ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले.

पॉलिहाऊस चे फायदे –

अटल भूजल योजनेअंतर्गत गावांमध्ये कृषी मिळावे तसेच महिला मेळावे घेऊन शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन तसेच शेडनेट अनुदाना बद्दल माहिती देण्यात येत होती.

  • रोपे नियंत्रित तापमानात वाढवली जातात त्यामुळे पीकांचे नुकसान होणे  किंवा नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
  • वर्षभर पिके घेऊ शकता आणि कोणत्याही विशिष्ट हंगामाची वाट पाहावी लागणार नाही.
  • पॉलीहाऊसमध्ये कीटक आणि कीटक कमी असतात.
  • बाह्य हवामानाचा पिकांच्या वाढीवर कोणताही परिणाम होणार नाही.
  • पॉलीहाऊसमध्ये उत्पादनाची गुणवत्ता स्पष्टपणे जास्त असते.
  • चांगला निचरा आणि वायुवीजन.
  • पॉलीहाऊसमध्ये शोभिवंत पिकांचा प्रसार सहजतेने करता येतो.
  • पॉली हाऊस तुमच्या रोपांना कोणत्याही ऋतूत योग्य पर्यावरणीय सुविधा देते.
  • त्यामुळे उत्पादनात सुमारे ५ ते १० पट वाढ होते.
  • कमी पीक कालावधी.
  • खतांचा वापर करणे सोपे आहे आणि ठिबक सिंचनाच्या मदतीने ते आपोआप नियंत्रित केले जाते.

महिला परसबाग स्पर्धा

अटल भूजल योजनेअंतर्गत गावांमध्ये महिलांना एकत्र करून पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगितले गेले त्याचप्रमाणे महिलांना घरगुती पाणी वापराबद्दल माहिती देण्यात आली. पाण्याचा योग्य वापर आणि बचत याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे महिलांना अटल भूजल योजनेतील परसबाग स्पर्धा याबद्दल माहिती देऊन ज्या महिलांची परसबाग उत्कृष्ट असेल अशा महिलांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. 

उपयोग आणि प्रभाव –

  1. रिचार्ज शाफ्ट –

गावातील पावसाचे पडणारे पाणी हे वाहून जात असत. अटल भूजल योजनेअंतर्गत गावामध्ये रिचार्ज घेण्यात आली. त्यामुळे वाहून जाणारे पाणी हे जमिनीत 100 फुटापर्यंत मुरविले गेले त्यातून भूजल पातळी वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली.

  • बंधाऱ्यातील गाळ उपसा –

बंधाऱ्यातील गाळ उपसा झाल्यामुळे बंधाऱ्याची पाण्याची साठवण क्षमता वाढली तसेच आजूबाजूच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली.

  • बंधारा दुरुस्ती –

अटल भूजल योजनेअंतर्गत गावामध्ये पाहणी करण्यात आली. पाणी पातळी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून गळती होणारे बंधारे दुरुस्ती करण्याचा ठराव जलसुरक्षा आराखड्यामध्ये घेण्यात आला. त्यातून गळती होणाऱ्या बंदरांची गळती थांबली आणि पाण्याची साठवणूक क्षमता देखील वाढली यातून भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली.

  • शेतीसाठी ड्रीप व ठिबक सिंचनचा वापर –

अटल भूजल योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन तसेच शेडनेट पॉलिहाऊस साठी अनुदान असल्याची माहिती शेतकरी मेळाव्यांमध्ये सांगितली त्याचप्रमाणे ठिबक सिंचन शेडनेट पॉलिहाऊस याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतो त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर न करता शेती केल्यास कोणते तोटे होतात यातील तफावत समजावून सांगितली असता गावातील सुरुवातीच्या काळात उन्हाळ्यात 40 % शेतकरी शेती पिकवत होते परंतु अटल भूजल योजनेतील कामांमुळे गावातील भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांच्या विहिरींची देखील पाणी पातळी वाढली आणि त्यातूनच अटल भूजल योजनेतील शेडनेट पॉलिहाऊस ठिबक साठी शेतकऱ्यांनी अनुदान घेतले आणि सद्यस्थितीमध्ये 90 ते 95 टक्के शेतकरी हे उन्हाळ्यात देखील आपली शेती पिकवत आहेत.

  • अटल भूजल योजना व भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमुळे भूजलपातळीतील वाढीसह गावात झालेले इतर सकारात्मक बदल

 अटल भूजल योजनेमध्ये गावातील १० निरीक्षण विहिरी निवडण्यात आल्या.विहिरीमधून दरमहा पाणी पातळी तपासली जाते. पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यानंतर गावातील निरीक्षण विहिरींच्या पाण्याची गुणवत्ता तपासली जाते.यामुळे आम्हाला पिक नियोजन करता येते.विहीर निरीक्षणमुळे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी किती प्रमाणात योग्य अयोग्य समजले जाते.

  •  रेनगेज स्टेशन-

 अटल भूजल मार्फत रेनगेज स्टेशन बसविण्यात आले या रेनगेज स्टेशनची दररोज २ वेळा नोंदी घेतल्या जातात. यामुळे पर्जन्यमान आम्हाला समजले जाते. गावामध्ये पिझोमीटर स्टेशन बसविण्यात आले त्यामध्ये DWLR ( डिजिटल वॉटर लेव्हल रेकॉर्डर) हे यंत्र बसविण्यात आले.यामुळे भूगर्भातील पाणी पातळीची नोंद होते.यामुळे पिक नियोजन करता येते.अटल भूजल योजनेमुळे झालेले बंधारे , रिचार्ज शाफ्ट यामुळे पाणी पातळीत वाढ झाली.सूक्ष्मसिंचन,शेडनेट,अटल भूजल योजनेमार्फत मिळणारे अधिक अनुदान याचाही शेतकऱ्यांना फायदा झाला. सूक्ष्मसिंचन अधिक वापरामुळे पाणी बचत व उत्पन्नात वाढ झाली. गावअंतर्गत असणारे बंधाऱ्यांची दुरुस्ती,नाले दुरुस्ती योजने मार्फत केल्याने भूगर्भाच्या पाण्याची टिकवण क्षमता वाढली गावातल्या शिवारातच जिरायला लागले त्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ झाली.अटल भूजल योजनेमुळे गावातील ग्रामस्थांच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण झाले गावात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आर्थिक स्थिती सुधारली पाण्याची क्षमता वाढल्यामुळे गावामध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला.

अटल भूजल योजनेतील कामांमुळे ग्रामपंचायतीला झालेले फायदे :-

योजनेमुळे गावात किती प्रमाणत पाऊस झाला हे प्रमाण मोजता येऊ लागले.    

  • विहितीतील पाण्याची गुणवत्ता तपासता येते.
  • शेतकऱ्यांना आपल्या विहिरीची पाणी पातळी तपासता येते.
  • शेतकरी ड्रिप,मल्चिंग, तुषार सिंचन, शेडनेट, रेन पाईप यासाठी शासनाच्या विविध योजनांनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो.
  • महिलांना पाणी बचतीचे महत्व समजले.
  • गावात रेन ऑटर हार्वेस्टिंग,रिचार्ज शॉप,शोषखड्डे, कच द रेन यामुळे पाण्याची भूजल पातळीत वाढ झाली.      
  • बंधाऱ्यांचे खोली करण केल्यामुळे पाण्याचा साठा करण्यास मदत झाली.
  • अटल भूजल योजनेमुळे गावाला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळालेहा खूप मोठा फायदा आहे.या बक्षीस रकमेतून भूजल संदर्भातील आवश्यक असणारी कामे करता येतील.

निष्कर्ष –

    अटल भूजल योजनेमुळे गावातील महिला तरुण शेतकरी विद्यार्थी यांना देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचे महत्व भविष्यातील कार्याची गरज किती महत्त्वाचे आहे हे समजले या अनुषंगाने गावातील प्रत्येक नागरिकांनी या योजनेत सहभाग घेऊन कार्य केले तसेच गावाच्या विकासासाठी सर्वात मोठा सहभाग गावातील नागरिक महिला मुले यांचा आहे त्याचप्रमाणे गावातील सरपंच सदस्य कर्मचारी शाळेतील शिक्षक यांनी मोठ्या परिश्रमाने योजना यशस्वी करण्यासाठी मदत केली या योजनेमुळे गावातील शेतकऱ्यांना तसेच ग्रामपंचायतला देखील मोठ्या प्रमाणात फायदा झाला. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत दातली या गावाने दुसरा क्रमांक मिळविला व मोठे स्वरूपात रक्कम जिंकली. त्यामुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायती देखील भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आणि त्या अनुषंगाने पाण्याची महत्त्व देखील गावकऱ्यांना समजले.

गावकऱ्यांची प्रतिक्रिया –

   मी ज्योती अनिल भाबड राहणार दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील रहिवासी महिला आहे. आमच्या गावामध्ये पाण्याची खूप टंचाई भासत होती. शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. जनावरांना तसेच माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन फिरावे लागत. यामध्ये शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात, परंतु आमच्या गावाने अटल भूजल योजना या ग्राम स्पर्धेत सहभाग घेतलेला होता. अटल भूजल योजनेअंतर्गत आमच्या गावामध्ये पाण्यासंदर्भात जी कामे करण्यात आली त्यामध्ये बंधाऱ्यांची दुरुस्ती, पूर चाऱ्यांची दुरुस्ती यामुळे पाण्याचा मोठा साठा होऊ लागला. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले. शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊ लागले. रिचार्ज शाफ्ट यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी उंचावली. पिजोमीटरमुळे गावातील लोकांना यामुळे पाणी पावसाचे प्रमाण मोजता येऊ लागले. गावातील ग्रामस्थांना पाणी बचतीचे महत्त्व समजून महिला पाणी बचत करून परसबाग तयार करू लागल्या परसबागेतून आपल्या कुटुंबाला मिळेल इतके भाजीपाला घेऊ लागल्या.. अटल भूजल योजनेमुळे आमच्या गावाला खूप फायदा झाला आमच्या गावाला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले त्या बक्षीस रकमेतून भूजल संदर्भातील काही कामे अजून करू शकतो. थँक्यू अटल भूजल योजना.

नाव – ज्योती अनिल भाबड             

मो.- ९६८९०७५६०५ 

मु.पो. – दातली ता.सिन्नर, जि- नाशिक

Youtube link –