मोदी आवास योजना

✓ योजनेचे स्वरूप

ज्या आदिवासी पारधी व्यक्तीकडे राहण्यास स्वतःचे पक्के घर नाही अशा लाभार्थ्यांना पक्की घरे बांधून देऊन त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणणे.

✓ लाभार्थी पात्रता

  • ज्या पारधी लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा अथवा कच्चे घरे आहे अशा लाभार्थ्यांस योजनेचा लाभ देता येईल.
  • इतर कोणत्याही योजनेतून घरकुलाचा लाभ त्या कुटुंबास पूर्वी देण्यात आलेला नसावा.
  • आदिवासी पारधी समाजातील विधवा, निराधार व परित्यक्त्या स्त्रियांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

✓ आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • ७/१२ उतारा व नमुना ८-अ
  • शाळा सोडल्याचा दाखला / वयाचा दाखला
  • जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
  • तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
  • शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
  • ग्रामसभेचा ठराव